
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी टाटा ग्रुपनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या नातेवाईकांना तातडीची अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं यापूर्वी १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यात अतिरिक्त २५ लाख रुपये म्हणजे एकूण सव्वा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एअर इंडियाकडून शनिवारी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.