

A dramatic scene at Delhi Airport as an Air India bus caught fire; timely action prevented a major accident.
esakal
Air India Bus Catches Fire at Delhi Airport : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल तीनवर एअर इंडियाची एक प्रवासी बस अचानक पेटली. या घटनेबाबत माहिती मिळताच विमान बचाव आणि अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळले. सुदैवाने बस पेटली तेव्हा बसमध्ये कुणीही नव्हते, त्यामुळे या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, शिवाय विमानतळावरील वातावरणही काही वेळातच पूर्ववत झाले.
दिल्ली विमानतळ व्यवस्थापनाकडून या घटेनाबाबत अधिकृतरित्या एक्स हँण्डलद्वारे माहिती दिली गेली आहे. एक्स वरील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, एका छोट्या घटनेत, एक ग्राउंड हँण्डलरने चालवलेल्या बसला आज दुपारी आग लागली. ग्राउंडवर उपस्थित आमच्या विशेषज्ञ एआरएफएफ टीम तत्काळ कृतीत आल्या आणि काही मिनिटांमध्येच आग विझवली गेली.
घटना घडली तेव्हा बस उभी होती आणि सुदैवाने पूर्णपणे रिकामी होती. त्यामुळे कोणतीही अघटीत घटना घडली नाही. विमानतळावरील सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. आमचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे.
याआधी आंध्र प्रदेशच्या विजयवाडा स्थित गन्नावरम इंटरनॅशनल एअरपोर्टवर सीमा शुल्क अधिकाऱ्याच्या खोलीत भीषण आग लागली होती. या आगीमुळे सॉफ्टवेअर उपकरणं, इमिग्रेशन रूममधील एक स्प्लिट एअर कंडिशनर आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या सामानाच्या पिशव्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदत करत आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.