Air India Cancels : एअर इंडियाच्या आठ विमानांचे उड्डाण रद्द; देखभाल प्रक्रिया काटेकोर केल्यामुळे फेरी रद्द केल्याचा दावा
Air India Passengers : एअर इंडियाने अधिक काटेकोर देखभाल प्रक्रियेअंतर्गत आठ विमानांचे उड्डाण रद्द केले. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था आणि रिफंडची सुविधा दिली आहे.
मुंबई : ‘एअर इंडिया’ने शुक्रवारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह आठ विमानांचे उड्डाण रद्द केले. देखभाल आणि दुरुस्ती प्रक्रिया अधिक काटेकोर केल्यामुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितले आहे.