
लखनऊ : अहमदाबाद विमान अपघातानंतर देशभरात विमान सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचा थेट परिणाम एअर इंडियाच्या उड्डाणांवर (Air India Cancellations) दिसून येत आहे. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये लखनऊ-दिल्ली मार्गावरील (Delhi-Lucknow Routes) अनेक उड्डाणांचा समावेश आहे.