Air India CEO: तांत्रिक बिघाडाचा उल्लेख नाही; विमान अपघात अहवालाबाबत ‘एअर इंडिया’च्या सीईओचा दावा
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात कोणताही यांत्रिक बिघाड वा देखभालीतील त्रुटी आढळून आलेली नाही. वैमानिक आणि विमान दोन्हीही नियमीत तपासणीत उत्तीर्ण असल्याचे ‘एअर इंडिया’चे सीईओ म्हणाले.
नवी दिल्ली : ‘‘गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात विमान किंवा इंजिनामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड किंवा देखभालीशी संबंधित समस्या आढळून आलेली नाही.