Air India : ‘एअर इंडिया’ची विमाने ‘जमिनी’वर ; कर्मचारी सामूहिक रजेवर,९० उड्डाणे रद्दमुळे प्रवाशांचे हाल

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीची ९० विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. केबिन क्रू सदस्यांनी काल रात्री उशिरा आजारपणाची सामूहिक रजा घेतल्याने कंपनीला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
Air India
Air Indiasakal

नवी दिल्ली : एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीची ९० विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. केबिन क्रू सदस्यांनी काल रात्री उशिरा आजारपणाची सामूहिक रजा घेतल्याने कंपनीला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अगदी ऐनवेळी सुमारे ३०० वरिष्ठ केबिन क्रू सदस्यांनी आजारी असल्याचे सांगत रजा जाहीर केली आणि त्यांचे मोबाईल फोनही बंद केले, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या केबिन क्रू सदस्यांनी कंपनीने दिलेल्या नुकसानभरपाई पॅकेजला विरोध केला असून, आपला निषेध व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कंपनी व्यवस्थापन रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असेही अधिकृत सूत्रांनी सांगितले.

‘‘आमच्या केबिन क्रूपैकी एका वर्गाने काल रात्री उशिरा आजारपणाची सामुहिक रजा घेतली, त्यामुळे काही विमानउड्डाणांना विलंब झाला, तर काही उड्डाणे रद्द करावी लागली. यामागची कारणे समजून घेण्यासाठी आम्ही केबिन क्रूशी चर्चा करत असून, प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’’ असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले.

Air India
Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

या अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अडचणीमुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्द्ल माफी मागत, कंपनीने उड्डाणे रद्द झाल्याबद्दल प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या तारखेला विनामूल्य प्रवास करण्याची ऑफर जाहीर केली आहे. अचानक विमानउड्डाणे रद्द झाल्याने आणि त्याची पूर्वसूचना न मिळाल्याने संतप्त झालेल्या अनेक प्रवाशांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर कंपनीने ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे उत्तर दिले आहे. अनेक प्रवासी विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली.

केबिन क्रूच्या विरोधाची कारणे

  • एअर इंडिया एक्स्प्रेस टाटा समूहात विलीन झाल्यानंतर केबिन क्रू कर्मचाऱ्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप

  • कर्मचाऱ्यांना मुलाखती देऊनही कमी पगाराच्या नोकरीची ऑफर

  • नुकसानभरपाई पॅकेजमधील मुख्य मुद्दे बदलले किंवा काढून टाकले असून, व्यवस्थापन विरोध करणाऱ्यांचे आवाज दाबत आहे.

  • विमानकंपनी सध्या ‘एआयएक्स कनेक्ट’बरोबर (पूर्वीचे एअरएशिया इंडिया) विलीनीकरणाच्या प्रक्रियेत

  • महिन्याभरापूर्वी टाटा समूहाच्या ‘विस्तारा’ या विमान कंपनीलाही वैमानिकांच्या समस्यांमुळे उड्डाणे रद्द करावी लागली होती, आता एअर इंडिया एक्सप्रेसवर संकट आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com