Air India Express cabin crew strike ends
Air India Express cabin crew strike endsesakal

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Air India Express : एअरलाइन आणि केबिन क्रू आता एकत्र काम करतील आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आता उड्डाणांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे. हा करार दोन्ही पक्षांसाठी दिलासा देणारा आहे.

Air India Express

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अचानक आजारी रजेवर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची रजा आता संपली आहे. म्हणजेच एअर इंडिया व्यवस्थापन आणि एअर इंडिया एक्सप्रेस युनियनमध्ये सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.

वाद संपल्यानंतर 'सिक रजे'वर गेलेले सर्व 100 हून अधिक कर्मचारी लवकरच त्यांच्या नोकरीवर परततील. कंपनीने सांगितले की सर्व निलंबित क्रू मेंबर्सचे निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले आहे, त्यामुळे आता आजारी रजेवर असलेले सर्व कर्मचारी देखील त्वरित प्रभावाने कामावर परत येतील.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रू मेंबर्सनी पगार, भत्ते आणि कामाच्या परिस्थितीशी संबंधित अनेक मागण्या घेऊन संप सुरू केला होता. 9 मे रोजी, 100 हून अधिक क्रू मेंबर्सने अचानक आजारी असल्याचा दावा करून कामावर येणे बंद केले होते. 

टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रू सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विचार करण्याचे मान्य केल्यानंतर संप मागे घेतला आहे. त्याच वेळी, कंपनीने 25 क्रू मेंबर्सची बडतर्फी देखील रद्द केली आहे.

सूत्रांनी गुरुवारी सांगितले की एअर इंडिया एक्स्प्रेसने केबिन क्रू सदस्यांशी करार केला आहे, त्यांच्या सर्व चिंता दूर केल्या आहेत. या कराराअंतर्गत, क्रू मेंबर्स आणि व्यवस्थापन या दोघांनीही विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने 25 क्रू मेंबर्सची बडतर्फी रद्द केली आहे. त्यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला संप संपला आहे.

Air India Express cabin crew strike ends
चिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण, अनेक दिग्गजांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान!

एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूच्या कमतरतेमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी 74 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. विमान कंपनीने अचानक रजेवर गेलेल्या 200 हून अधिक केबिन क्रू मेंबर्सपैकी 30 जणांना कामावरून काढून टाकले होते. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांना आज दुपारी 4 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले होते, ते पूर्ण न केल्यास सर्वांना कामावरून काढून टाकण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

यापूर्वी मंगळवार आणि बुधवारी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 100 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

Air India Express cabin crew strike ends
चिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण, अनेक दिग्गजांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com