Air India Express: उड्डाण केल्यानंतर विमानाचं 50 मिनिटांतच लँडिंग, १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला

भारतातून मस्कतला निघालेल्या या विमानाबाबत नक्की काय घडलंय जाणून घ्या
Air India Express
Air India Express

नवी दिल्ली : केरळच्या त्रिवेंद्रम इथून मस्कतला (ओमानची राजधानी) निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. या विमानातून १०५ प्रवाशी प्रवास करत होते. उड्डाणानंतर केवळ तासाभरातच हे विमान पुन्हा खाली उतरवण्यात आलं. यामुळं प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. (Air India Express plane Trivendram to Muscat landed within 50 minutes after take off)

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानानं सकाळा ८.३० वाजण्याच्या सुमारास त्रिवेंद्रम विमानतळावरुन मस्कतसाठी उड्डाण केलं होतं. पण उड्डाणानंतर पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय या पायलटनं घेतला. त्यानंतर ९.१७ वाजता हे विमान पुन्हा त्रिवेंद्रम विमानतळावर उतरवण्यात आलं.

Air India Express
Nashik Crime News : पंचवटीतील खूनाचा अखेर उलगडा

काय झाला होता बिघाड

विमान कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात FMS अर्थात फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं विमान पुन्हा लँड करण्याचा निर्णय पायलटनं घेतला.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सर्व प्रवाशी सुरक्षित

विमानात तांत्रिक बिघाड झाला असला तरी त्याचं सुरक्षित लँडिंग करण्यात आल्यानं या विमानातून प्रवास करणारे सर्व १०५ प्रवाशी सुरक्षित आहेत. यानंतर या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी दोन वाजेपर्यंत या दुसऱ्या विमानाचं उड्डाण होईल असंही विमान कंपनीनं सांगितलं आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेण्यात आल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com