Nashik Crime News : पंचवटीतील खूनाचा अखेर उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : पंचवटीतील खूनाचा अखेर उलगडा

नाशिक : मखमलाबाद रोडवरील समर्थ नगराजवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा खून कोणी व कशासाठी केला असावा याबाबत मात्र अद्याप पोलिसांचा तपास सुरू आहे.

गेल्या शनिवारी (ता. २१) सकाळी हमालवाडीजवळील मोकळ्या जागेत चेहरा दगडाने ठेचून तरुणाची निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Murder in Panchvati is finally solved Dead youth from Satpur Killer still unknown Nashik News)

हेही वाचा: Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात

दरम्यान, मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून शहरातील बेपत्तासंदर्भात माहिती घेतली जात होती. त्यामध्ये सातपूरमधील तरुण ऋषिकेश हा गेल्या शनिवारपासूनच बेपत्ता असल्याचे समोर आले होते.

पंचवटी पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटविली असता, तो ऋषिकेशचा असल्याचे निष्पन्न झाले.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News: ‘वसाका’ निवृत्त कर्मचारी पगार न मिळाल्याने आक्रमक; अनेकांंवर उपासमारीची वेळ

सातपूर येथील एका कंपनीत ऋषिकेश कंत्राटी कामगार होता. त्याला विविध प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेला असल्याचे तपासातून समोर आले आहे. ऋषिकेशची ओळख पटल्याने त्याची हत्या कुणी व का केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

त्याच्याशी निगडित असलेल्यांशी चौकशी केली जात आहे. तसेच, पंचवटीच्या रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांचीही चौकशी केली जात आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक युवराज पत्की हे करीत आहेत.

हेही वाचा: Nashik: आपल्या शक्तीने कॅन्सर बरा करा अन् मिळवा 51 लाख रोख; नाशिकच्या महंतांकडून बक्षिस जाहिर