
नवी दिल्ली: इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आगीचे संकेत वैमानिकाला प्राप्त झाल्यानंतर हे विमान आपत्कालीन स्थितीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने इंदूरकडे रवाना करण्यात आले. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.