Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द | Air India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air-India

Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona Cases) वाढत्या रूग्णसंख्येचा फटका पुन्हा एकदा विमानसेवांवर (International Flight) दिसू लागला असून, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर एअर इंडियाकडून (Air India) हाँगकाँगला (Hong Kong) जाणारी विमान सेवा 23 एप्रिलपर्यंत बंदी करण्यात आली आहे. फ्लाइटमध्ये तीन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हाँगकाँगने फ्लाइटवर बंदी घातली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Air India Canceled Hong Kong Flight )

16 एप्रिल रोजी आढळले संक्रमित

प्रवासाच्या 48 तास आधी केलेल्या कोरोना चाचणीचा (Corona Test Report) अहवाल निगेटिव्ह आला तरच भारतातील प्रवासी हाँगकाँगला जाऊ शकतील, असे सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाँगकाँगमधील विमानतळ परिसरात आल्यावर कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार, 16 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या AI316 दिल्ली-कोलकाता-हाँगकाँग फ्लाइटमध्ये उपस्थित तीन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला आहे.

एअर इंडियाकडून ट्वीट

दोन वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर 27 मार्च रोजी भारताकडून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांकडून नव्याने जाहीर कोविड-19 निर्बंधांमुळे आणि मर्यादित मागणीमुळे एअर इंडियाने हाँगकाँगला जाणारी विमानसेवा 24 एप्रिलपर्यंत रद्द केली असल्याचे एअर इंडियाने ट्वीट करत सांगितले आहे.

Web Title: Air India Flights To Hong Kong Banned Till April 24 After 3 Passengers Tested Positive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top