Air India Flight Reduction : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने त्यांच्या वाइडबॉडी विमानांच्या (Widebody Aircraft) आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय २० जून ते १५ जुलै या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत तांत्रिक अडचणींमुळे अचानक व्यत्यय निर्माण झाल्यास वापरण्यासाठी एक राखीव विमानही तयार ठेवण्यात आले आहे.