Ahmedabad Air India plane crash survivor New Video Viral esakal
देश
AHMEDABAD PLANE CRASH: विमान अपघातातून 'तो' एकटाच कसा बाहेर आला! व्हिडिओ पाहून धक्का बसेल, आगीतून येतानाचा विश्वासकुमारचा व्हिडिओ व्हायरल
Ahmedabad Air India plane crash survivor New Video Viral : अहमदाबाद दुर्घटनेत 242 प्रवाश्यांपैकी रमेश विश्वास कुमार हा फक्त एक प्रवासी वाचला. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला. हे विमान हॉस्टेलवर पडल्याने तिथल्या विद्यार्थ्यांचाही जीव गेला. या विमानात 242 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. परंतु या सगळ्यात एक प्रवासी जिवंत राहिला. पंतप्रधानांनी भेट घेत विमानात अपघातावेळी नक्की काय घडलं याची विचारपूस केली. दरम्यान आता रमेश विश्वासकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय.
