
Air India: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा ग्रुपचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी आपल्या सहकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी इतक्या प्रवाशांनी प्राण गमावल्याबद्दल अतिव दुःख व्यक्त केलं आहे. तसंच आपण कंपनीचे सर्व कर्मचारी म्हणून या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असं सांगितलं.
तसंच टाटा ग्रुपच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी भारतीय तपास पथकांसह युके आणि युएसएची पथकं देखील अहमदाबादेत दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.