
Air India Plane Crash: अहमदाबाद इथं झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या २४२ प्रवाशांपैकी केवळ एक जण बचावल्याची माहिती सध्या मिळते आहे. पण ज्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालं आहे, त्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. टाटा ग्रुपनं ही मोठी घोषणा केली आहे.