
Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानं त्यात जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रवाशांचे नातेवाईक घटनास्थळी अर्थात अहमदाबादला जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळं आता टाटा ग्रुपनं या नातेवाईकांसाठी विशेष विमानं अहमदाबादला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्या नातेवाईकांना अहमदाबादला जायचं आहे त्यांनी एअर इंडियाच्या हॉटलाईनवर थेट संपर्क साधण्याचं आवाहनही टाटा ग्रुपकडून करण्यात आलं आहे.