Air India Urination Case : लघुशंकाप्रकरणी टाटांच्या एअर इंडियावर DGCA ची मोठी कारवाई

नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Air India
Air IndiaFile Photo

Air India Urination Case : विमान प्रवासादरम्यान महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी DGCA ने मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Air India
Brij Bhushan Singh Controversy : बृजभूषण प्रकरणावर चित्रा वाघ गप्प का?

या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्राने आपण असं काहीही केलं नसल्याचं म्हटले होते. तक्रारदार महिलेनेच स्वतःच्या अंगावर लघवी केली होती अशी माहिती मिश्राने त्याला दिल्ली न्यायालयात हजर केल्यानंतर दिली होती. त्याच्या या जबाबाने अनेक स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

Air India
Videocon Chairmen Venugopal Dhoot CBI Arrest: चेअरमन वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली, काय आहे ICICI बँक घोटाळा? 

26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघवी केली होती. घटनेवेळी मिश्रा दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार केली होती. 

आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने ४ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला 6 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली होती.

त्यानंतर मिश्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, एअर इंडियाकडून मिश्रावर 30 दिवसांसाठी उड्डाण बंदी घातली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com