बापरे! जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी 63 शहरं भारतात!

air pollution report 2021 worlds 100 top  most polluted places  63 cities are Indian check details
air pollution report 2021 worlds 100 top most polluted places 63 cities are Indian check details Sakal media

मागच्या दोन वर्षांपासून सलग राजधानी दिल्ली ही जगातील सर्वांधिक प्रदुषित राजधानी बनली आहे. प्रदुषणाबाबतीत बांग्लादेशची राजधानी ढाका सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. IQAir या स्विस फर्मने जारी केलेल्या जागतिक हवेच्या गुणवत्ता अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील वायू प्रदूषण खूपच मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

या रिपोर्टनुसार सरासरी वायु प्रदूषण, प्राणघातक आणि सूक्ष्म PM2.5 प्रदूषकामध्ये मोजले जाते, जे भारतात 58.1 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतके आहे. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांच्या 10 पट जास्त आहे. भारतातील कोणतेही शहर डब्ल्यूएचओचे हे स्टँडर्ड पूर्ण करत नाही.

उत्तर भारतातील शहरांचीच स्थिती ही सर्वात वाईट आहे. देशाती राजधानी दिल्ली ही सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषणात जवळपास 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथील वायू प्रदूषणाची पातळी डब्ल्यूएचओच्या सुरक्षा मर्यादेपेक्षा जवळपास 20 पट जास्त होती, वार्षिक सरासरीसाठी पीएम 2.5 मध्ये प्रति घनमीटर 96.4 मायक्रोग्राम आहे. तर सुरक्षित मर्यादा ही 5 आहे.

हवा प्रदुषण वाढण्यामध्ये पीएम 2.5 ची भूमिका सर्वांधिक महत्त्वपूर्ण ठरते. हवेत जर याची मात्र अधिक असेल तर अस्थमा, स्ट्रोक, हृदय आणि फुप्फुससंदर्भातील आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, पीएम 2.5 मुळे जगभरातील लाखो लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो.

भारतीय शहरांचे वर्चस्व

दिल्लीमध्ये वायू प्रदूषण हे जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर पोहचले आहे, तर जगातील सर्वात प्रदूषित ठिकाण राजस्थानचे भिवंडी, त्यानंतर उत्तर प्रदेशचे गाझियाबाद याचा नंबर लाहतो. महत्वाचे म्हणजे जगातील टॉप 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दहा शहरं ही भारतातील आणि मुख्यतः देशाच्या राजधानीच्या आसपासची आहेत.

100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांच्या यादीत भारतीय शहरांची संख्या जास्त आहे. पहिल्या शंभर शहरांच्या यादीत 63 ठिकाणे ही भारतातील आहेत. ज्यापैकी निम्म्याहून अधिक हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. शिकागो विद्यापीठाने विकसित केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' नुसार, जर हवेच्या गुणवत्तेची पातळी WHO च्या स्टँडर्डशी जुळली तर त्यांच्या आयुर्मानात सुमारे एक दशकाची भर पडू शकते.

हवा इतकी प्रदुषीत असण्याचे कारणे काय?

या ठिकाणी वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहनांचे उत्सर्जन, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक कचरा, स्वयंपाकासाठी बायोमास चा वापर आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश होतो. खरं तर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, दिल्लीच्या आसपासचे अनेक मोठे ऊर्जा प्रकल्प तसेच अनेक उद्योग प्रथमच वायू प्रदूषणाच्या तीव्र पातळीमुळे बंद झाले होते. भारताचा या संकटामुळे होणारा आर्थिक खर्च वार्षिक $150 अब्ज पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

air pollution report 2021 worlds 100 top  most polluted places  63 cities are Indian check details
जगात दिल्लीच सर्वांत प्रदुषित राजधानी! सलग दुसऱ्या वर्षी हवेची गुणवत्ता सर्वांत खराब

हृदय आणि फुफ्फुसाचे आजार आणि इतर अनेक गंभीर आरोग्य परिणामांसोबतचआरोग्यावर होणारा परिणाम खूपच वाईट आहे. यासोबतच वायू प्रदूषणामुळे प्रत्येक मिनिटाला अंदाजे तीन मृत्यू होत आहेत. चेन्नई वगळता सर्व सहा मेट्रो शहरांमध्ये गेल्या वर्षी वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, 2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार दिल्ली, कोलकाता आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. संसदेत नुकत्याच झालेल्या एका नोंदीनुसार दिल्लीत 'खराब' ते 'गंभीर' या दरम्यान हवेची गुणवत्ता असलेले दिवस गेल्या वर्षीच्या 139 दिवसांच्या तुलनेत वाढून 168 म्हणजे 21 टक्क्यांनी जास्त होते; कोलकाता येथे 83 तुलनेत 74 दिवस आणि मुंबईत 20 तुलनेत 39 दिवस इतके होते.

air pollution report 2021 worlds 100 top  most polluted places  63 cities are Indian check details
टाटा मोटर्सची वाहने महागणार; १ तारखेपासून किंमतीत होणार 'इतकी' वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com