पुण्याच्या हवेची गुणवत्ता तुलनेने चांगली

‘सफर’संस्थेचा चा दावा; नियमांचे पालन केल्यास ९४८ कोटींची बचत
पुण्याच्या हवेची गुणवत्ता तुलनेने चांगली
पुण्याच्या हवेची गुणवत्ता तुलनेने चांगलीsakal media

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीप्रमाणेच देशातील बहुतांश शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या तीव्र झाल्याने लोकांच्या आरोग्यासमोर मोठे संकट निर्माण झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात पुण्यातील हवा तुलनेने अधिक शुद्ध असून सरकारची हवा गुणवत्तेबाबत अंदाज व्यक्त करणारी संस्था ‘सफर’ने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले तर पुणेकरांच्या आरोग्यावरील खर्चामध्ये ९४८ कोटी रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते, असे या संस्थेने म्हटले आहे.

सध्या प्रदूषणामुळे हैराण झालेली दिल्ली या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनातून तब्बल ७ हजार ६९४ कोटी रुपयांची बचत करू शकते, असेही या संस्थेचे म्हणणे आहे.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) ची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादेतील हवेच्या गुणवत्तेबाबत अंदाज वर्तविण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. ‘सफर’च्या टीमने ‘इम्पॅक्ट ऑफ सफर एअर क्वालिटी फोरकास्टिंग फ्रेमवर्क अँड ॲडव्हायजरी सर्व्हिसेस इन रिड्यूसिंग दि इकॉनॉमिक हेल्थ बर्डन ऑफ इंडिया’ नावाचा शोध निबंध सादर केला असून तो ‘रिजनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिसर्च’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीममध्ये सुवर्णा टिकले, इशिका इल्मे आणि प्रो. गुफरान बेग यांचा समावेश होता.

उपचारावरील खर्च अधिक

हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनविकारांवरील उपचारावर मोठा खर्च केला जातो. महानगरांमध्ये या प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे. या संसर्गजन्य आजारांवरील उपचारापोटी फार मोठी रक्कम खर्च केल्या जाते. ‘सफर’ तीन दिवस आधीच हवेच्या गुणवत्तेबाबत अंदाज व्यक्त करत असते, त्याचा आधार घेत उपाययोजना करण्यात आल्या तर दिल्लीतील लोकांचे २ हजार १९२ कोटी रुपये आणि पुण्यातील नागरिकांची दोनशे कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असे या संस्थेचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com