अजय-अतुल झिंग,झिंग झिंगाट; हृतिक, प्रियांकाला मागे टाकून फोर्ब्सचा यादीत

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

फोर्ब्स'च्या यादीवर 'विराट' ठसा 
नामांकित 100 जणांच्या यादीत विराट कोहली सर्वोच्च स्थानी; सलमानची पीछेहाट 
नवी दिल्ली, ता. 20 (वृत्तसंस्था) ः प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने 2019मधील भारतातील 100 नामांकितांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात कमाईच्या स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा प्रथम स्थानावर झळकला आहे.

नवी दिल्ली : 'फोर्ब्स'च्या 2019च्या यादीत सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित-नेने या दिग्गजांसह अजय-अतुल या मराठी संगीतकार जोडगोळीने स्थान मिळविले आहे. अजय-अतुल यांची यंदाची कमाई 77.71 कोटी रुपये आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदी चित्रपट संगीतक्षेत्रात या बंधूंनी वेगळा ठसा उमटविला आहे. कमाईच्याबाबतीत त्यांनी ऋतिक रोशन, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा, रोहित शर्मा, अनुष्का शर्मा, वरुण धवन, आयुष्मान खुराणा अशी विविध क्षेत्रांतील मंडळी व दक्षिणेतील "स्टार' महेश बाबू यालाही मागे टाकले आहे. धडक, सुपर 30, पानिपत आणि आगामी 'तानाजी' या हिंदी चित्रपटांना संगीत देऊन अजय-अतुल या जोडीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.

उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी

फोर्ब्स'च्या यादीवर 'विराट' ठसा 
नामांकित 100 जणांच्या यादीत विराट कोहली सर्वोच्च स्थानी; सलमानची पीछेहाट 
नवी दिल्ली, ता. 20 (वृत्तसंस्था) ः प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने 2019मधील भारतातील 100 नामांकितांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात कमाईच्या स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा प्रथम स्थानावर झळकला आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या क्रिकेटपटूंना "धोबीपछाड' दिला आहेच, शिवाय सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार अशा बॉलिवूडच्या "दादा' अभिनेत्यांनाही मागे टाकले आहे. 

"फोर्ब्स'ची ही यादी कोणत्याही प्रसिद्ध, नामांकित व्यक्तींचे करिअर, त्यांची कमाई, सोशल मीडियावर त्यांची प्रसिद्धी आणि त्यांच्या- त्यांच्या क्षेत्रातील यशाचे मूल्यमापन या आधारावर तयार केली जाते. गेल्या वर्षी या यादीत सलमान खान सर्वोच्च स्थानी, तर विराट दुसऱ्या स्थानावर होता. या वेळी विराट कोहलीने त्याला मागे टाकले आहे. विराटच्या कमाईने 252.72 कोटी रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अक्षय कुमारने या वर्षी तीन हिट चित्रपट देत "फोर्ब्स'च्या यादीतही यशाची कमान चढती ठेवली आहे. त्याने 293.25 कोटी रुपये कमाईसह दुसरे स्थान मिळविले आहे. 

बॉलिवूडचा "दबंग' सलमान खानने या वर्षी 229.25 कोटींची कमाई केली असून, त्याची पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. "शहेनशहॉं' अमिताभ बच्चन यांनी या वर्षी उंच उडी मारत सातव्यावरून चौथ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. त्यांची कमाई आहे 239.25 कोटी रुपये एवढी. "झिरो' चित्रपटानंतर "किंग खान' शाहरुख खान याची चित्रपट कारकीर्द यंदा फारशी सुखावह ठरली नसली, तरी त्याची "ब्रॅंड व्हॅल्यू' कमी झाली नसल्याचे यादीतील त्याच्या कामगिरीवरून दिसून येते. 124.38 कोटींसह तो सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेटमध्ये "कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी पाचव्या स्थानावर आहे. त्याने यंदा 135.93 कोटी कमावले आहेत. 

"ऑस्कर'साठी भारताकडून निवड झालेला "गली बॉय'चा नायक रणवीरसिंहने सातवा क्रमांक मिळविला आहे. त्याची कमाई 118.2 कोटी आहे. याच चित्रपटातील त्याची नायिका आलिया भट्टने त्याच्यामागोमाग आठवे स्थान मिळविले असून 59.21 कोटी रुपयांची कमाई तिने केली आहे. रणवीरची "रिअल लाइफ'मधील पत्नी व अभिनेत्री दीपिका पदुकोण 48 कोटींसह दहाव्या स्थानी आहे. नववा क्रमांक "क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने पटकावला आहे. त्याची कमाई 79.96 कोटी रुपये आहे. यादीतील 

चमकते तारे व त्यांची कमाई (आकडे कोटींत) 
1) विराट कोहली : 252.72 
2) अक्षय कुमार : 293.25 
3) सलमान खान : 229.25 
4) अमिताभ बच्चन : 239.25 
5) महेंद्रसिंह धोनी : 135.93 
6) शाहरुख खान : 124.38 
7) रणवीरसिंह : 118.2 
8) आलिया भट्ट : 59.21 
9) सचिन तेंडुलकर : 79.96 
10) दीपिका पदुकोण ; 48 
12) अजय देवगण : 94 
13) रजनीकांत : 100 
14 ) प्रियांका चोप्रा : 23.4 
15) आमीर खान : 85 
22) अजय-अतुल : 77.91


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Atul include Forbes India Celeb 100 list of the highest-earning celebrities