esakal | अजय बिसारिया मायदेशी परतले
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay-Bisaria

पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडल्यानंतर पाकमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे आज मायदेशी परतले. जम्मू- काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम भारताने संपुष्टात आणल्यानंतर पाकनेही द्विपक्षीय राजनैतिक संबंधांची पातळी घटवित भारतासोबतची चर्चेची दारे कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजय बिसारिया मायदेशी परतले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली - पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडल्यानंतर पाकमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे आज मायदेशी परतले. जम्मू- काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम भारताने संपुष्टात आणल्यानंतर पाकनेही द्विपक्षीय राजनैतिक संबंधांची पातळी घटवित भारतासोबतची चर्चेची दारे कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकने त्यांचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त मोईन- उल-हक यांना दिल्लीला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बिसारिया यांनी शनिवारीच इस्लामाबाद सोडले होते, ते दुबई मार्गे भारतात दाखल झाल्याचे समजते.
loading image