
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना ‘भारतीय जेम्स बाँड’ असं का म्हटलं जातं, याचं उत्तर त्यांच्या धाडसी कारवायांमध्ये दडलं आहे. केरळ कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी असलेले डोवाल यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक जोखमीचे ऑपरेशन्स यशस्वी केले. त्यापैकी सर्वात थरारक आहे त्यांची पाकिस्तानातील सात वर्षांची गुप्तहेर कारकीर्द, जिथे ते मुस्लिम वेशात राहिले. नुकताच त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी एका मशिदीतील चित्तथरारक प्रसंग सांगितला आहे.