

Astounding journey of Ajit Jogi, the first Chief Minister of Chhattisgarh.
Sakal
राजकारणात प्रवेश मिळवण्यासाठी आणि आमदार-खासदार होण्यासाठी अनेक नेते कित्येक वर्षे पक्षाच्या दारात खस्ता खातात. मात्र, देशाच्या पंतप्रधानांचा केवळ एक फोन कॉल येतो आणि इंदूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी क्षणाचाही विचार न करता भारतीय प्रशासकीय सेवेचा (IAS) थेट राजीनामा देतात, अशी अविश्वसनीय घटना भारतीय राजकारणाच्या इतिहासात घडली आहे. ते नेते दुसरे-तिसरे कोणी नसून छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत अजित जोगी हे होते!