

Ajit Pawar Memorial Tribute
esakal
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक पणती दादांसाठी... असंख्य आठवणी त्यांच्या कार्यासाठी...’ या उपक्रमाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बारामती येथील सनसेट पॉईंटवर मंगळवारी दहा हजारांहून अधिक पणत्या प्रज्वलित करून अजितदादांना आबालवृद्धांकडून आदरांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार, अजितदादांच्या भगिनी विजया पाटील, ऋतुजा जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.