Ajit Pawar NCP : अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी; राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल

Ajit Pawar
Ajit Pawar Sakal

मुंबईः अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला असून या विजयामुळे अजित पवार गटाचे आता देशातील तीन राज्यात आमदार असून यात महाराष्ट्र, नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला दहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा असून पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "महाराष्ट्र, नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेशातील विजयामुळे, आम्ही आमचे हे ध्येय साध्य करण्यापासून फक्त एक राज्य दूर असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी यात म्हटले आहे. तसेच या विजयाबद्दल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष लेखा साया यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Ajit Pawar
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी केलं तिहार कारागृहात आत्‍मसमर्पण; म्हणाले, 'मी या हुकूमशाहीविरुद्ध...'

"पक्षासाठी यापुढेही याच गतीने पुढे चालत राहू आणि आणखी मोठ्या विजयासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

अरुणाचल विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे निकील कामीन, लिखा सोनी आणि टोकू टाटम हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

Ajit Pawar
T20 World Cup: पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या पठ्ठ्याची आतिषबाजी; 10 सिक्स ठोकत 'युनिवर्स बॉस' गेलची केली बरोबरी

आमचा पक्ष लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतभर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी या विजयाबद्दल देताना म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com