T20 World Cup: पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या पठ्ठ्याची आतिषबाजी; 10 सिक्स ठोकत 'युनिवर्स बॉस' गेलची केली बरोबरी

Aaron Jones: अमेरिकेच्या ऍरॉन जॉन्सने टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात 10 षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी करत अनेक मोठे विक्रम केले आहेत.
Aaron Jones
Aaron JonesSakal

USA vs Canada: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) सकाळी सुरुवात झाली. पहिला सामना डेलासला यजमान अमेरिका आणि कॅनडा या संघात पार पडला. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने 7 विकेट्सने मोठा विजय मिळवला.

अमेरिकेच्या या विजयात ऍरॉन जॉन्सने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे. जॉन्सने या सामन्यात अमेरिकेसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांची बरसात करत नाबाद 94 धावा फटकावल्या.

त्यामुळे त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलची बरोबरी करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावरही गेलचेच नाव आहे.

Aaron Jones
T20 World Cup : अमेरिकेतील वातावरण क्रिकेटमय; बास्केटबॉल, बेसबॉलच्या देशात क्रिकेटचा बोलबाला

गेलने 2016 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक करताना 11 षटकार मारले होते. तसेच त्याने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळीत 10 षटकार मारले होते.

या यादीत भारतचा युवराज सिंग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 7 षटकार मारले होते. त्याच्यासह या यादीत चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर, गेल, ब्रेंडन मॅक्युलम, शेन वॉटसन, स्टीफानस मॅहर्ग, मार्टिन गप्टील आणि ऍलेक्स हेल्स हे खेळाडूही संयुक्तरित्या आहेत.

टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटर

  • 11 षटकार - ख्रिस गेल

  • 10 षटकार - ख्रिस गेल

  • 10 षटकार - ऍरॉन जॉन्स

  • 8 षटकार - रिली रुसौ

  • 7 षटकार - युवराज सिंग

  • 7 षटकार - डेव्हिड वॉर्नर

  • 7 षटकार - ख्रिस गेल

  • 7 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम

  • 7 षटकार - शेन वॉटसन

  • 7 षटकार - स्टीफानस मॅहर्ग

  • 7 षटकार - मार्टिन गप्टील

  • 7 षटकार - ऍलेक्स हेल्स

गेलच्या पंक्तीत स्थान

ऍरॉन जॉन्सचा हा टी20 वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना होता. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात सर्वोच्च धावांची खेळी करणारा जॉन्स दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 वर्ल्ड कपमधील त्याचा पहिला सामना खेळताना 57 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती.

Aaron Jones
T20 World Cup 2024: पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणार नाही बॉलिंग, जाणून घ्या कारण

अमेरिकेसाठी वेगवान अर्धशतक

जॉन्सने नाबाद 94 धावांची खेळी करताना 22 चेंडूच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा अमेरिकेचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम स्टीव्हन टेलरच्या नावावर होता. त्याने काही दिवसांपूर्वी कॅनडाविरुद्धच 24 चेंडूत अर्धशतक केले होते.

अमेरिकेचा विजय

दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 194 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून नवनीत धलीवालने 61 धावांची आणि निकोलस कार्टनने 51 धावांची खेळी केली होती. अमेरिकेकडून अली खान, हरमीत सिंग आणि कोरे अँडरसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

त्यानंतर 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अमेरिकेने जॉन्सच्या खेळीच्या जोरावर 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. जॉन्सव्यतिरिक्त अमेरिकेकडून अँडिस गौसनेही 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅनडाकडून गोलंदाजी करताना कलीम सना, डिल्लोन हेलिगन आणि निखील दत्त यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com