

Akasa Air ticket price increase
ESakal
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात विमान इंधनाच्या (ATF) किमती अचानक गगनाला भिडल्या आहेत. विमान कंपन्या आता हा अतिरिक्त खर्च थेट सामान्य प्रवाशांवर लादत आहेत. देशातील प्रमुख विमान कंपन्या, एअर इंडिया आणि इंडिगो यांच्या पाठोपाठ, अकासा एअरने आता त्यांच्या प्रवाशांवर अतिरिक्त इंधन अधिभार आकारण्याची घोषणा केली आहे.