पाकिस्तानचे हल्ले ९ आणि १० मेच्या रात्री परतावून लावण्यात भारताच्या ‘आकाशतीर’ प्रणालीचा प्रमुख वाटा होता. काय आहे ही आकाशतीर यंत्रणा?.काय आहे आकाशतीर?पूर्णतः स्वदेशी उत्पादन, ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक. पाकिस्तानच्या एच क्यू-९ आणि एच क्यू-१६ या संरक्षण प्रणालीला रोखण्यामध्ये ‘आकाशतीर’चा समावेश होता. ‘आकाशतीर’ या पूर्णपणे स्वयंचलित संरक्षण प्रणालीने रिअल-टाइम लक्ष्य नष्ट करून ड्रोन युद्धात यशस्वीरित्या भाग घेतला..डीआरडीओ, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इस्रो यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘आकाशतीर’ प्रणाली तयार झाली आहे.‘आकाशतीर’ सर्व संबंधित घटकांना (नियंत्रण कक्ष, रडार) एकसंध हवाई आक्रमणाबाबतचे चित्र प्रदान करते. ही प्रणाली शत्रूची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे ओळखणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि त्यांच्याशी लढा देणे या प्रक्रिया करते.ही प्रणाली विविध रडार प्रणाली, सेन्सर्स यांच्याकडून माहिती एकत्र करते. कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कम्प्युटर्स, इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स अशा विविध पातळ्यांवर ही यंत्रणा काम करते.ही प्रणाली वाहनाधारित असल्यामुळे ती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हाताळणे सुलभ होते. शत्रूच्या लक्ष्यांवर जलद कारवाई या यंत्रणेने शक्य होते..फरक काय?परंपरागत हवाई संरक्षण प्रणाली प्रामुख्याने जमिनीवर आधारित रडार, मानवी देखरेखीखालील प्रणाली आणि कमांड चेनद्वारे कार्यान्वित होणाऱ्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची बॅटरी यांवर अवलंबून होती. ‘आकाशतीर’ ही पारंपरिक चौकट मोडून टाकते; तिच्या तंत्रज्ञानामुळे कमी उंचीवरील हल्ले, जमिनीवरून हवाई क्षेत्रात मारा करणाऱ्या यंत्रणेवर लक्ष्य ठेवता येते. केवळ बचावात्मक भूमिका न घेता दहशतवादी धोक्यांविरुद्ध आक्रमक प्रत्युत्तर देण्याच्या दिशेने झालेला बदल ‘आकाशतीर’ यंत्रणेत दिसतो..अशी झाली कारवाईआकाशतीरच्या माध्यमातून पाकिस्तानी ड्रोन, मिसाइल, यांना लक्ष्य करण्यात आले.पाकिस्तानच्या हल्ल्याची नक्की दिशा काय असेल, हवामानाचा त्यावर होणारा परिणाम आदी मुद्देही आकाशतीरच्या माध्यमातून आपल्याला समजले.जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना निकामी करण्याची आकाशतीरची क्षमता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्यात याच स्वरूपाचे काम झाले..आकाशचे योगदानऑपरेशन सिंदूरदरम्यान आकाश क्षेपणास्त्राने महत्त्वाची भूमिका बजवली. या क्षेपणास्त्राविषयी...लघु ते मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणालीसंरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित. हवाई दल आणि लष्करात वापर१९८० च्या दशकामध्ये या प्रणालीच्या निर्मितीची आणि विकासाची प्रक्रिया सुरू नव्वदच्या दशकात पहिल्यांदा चाचणीया प्रणालीचा उद्देश असुरक्षित क्षेत्रे व महत्त्वाच्या ठिकाणांना संरक्षण कवच देणे.सुरुवात कधी?आकाश क्षेपणास्त्र प्रणाली पहिल्यांदा हवाई दलाने सन २०१४ मध्ये वापरली. त्यानंतर सन २०१५ मध्ये लष्करासाठी तिचा वापर सुरू करण्यात आला. ‘डीआरडीओ’च्या माहितीनुसार आकाश ही प्रणाली ९६ टक्के स्वदेशी आहे. २५० हून अधिक उद्योग आकाशच्या विविध उपप्रणाली आणि घटकांच्या उत्पादन व पुरवठ्यात सहभागी आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनामिक्स लिमिटेड या दोन कंपन्या या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाच्या कंपन्या आहेत..Boycott Turkey : पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करणाऱ्या तुर्की विरोधात ‘स्वदेशी जागरण’ची आंदोलन.मॅक २.५आकाशचा वेग८० किलोमीटरसुरुवातीच्या टप्प्यातील लक्ष्य५५ किलोग्रॅमप्री-फ्रॅगमेंटेड वॉरहेड प्रॉक्सिमिटी फ्यूजचेवजन१२० किलोमीटरअतिरिक्त पल्ल्यातील लक्ष्य.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.