अकबर मंत्रिपदाचा राजीनामा देणार? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील तिच्या #MeToo या वादळाने अनेकांचे बुरखे फाडल्यानंतर आता या कॅम्पेनची धग दिल्लीपर्यंत पोचली आहे. महिला पत्रकारांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार, ज्येष्ठ संपादक एम. जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले जाऊ शकते. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या अकबर यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील तिच्या #MeToo या वादळाने अनेकांचे बुरखे फाडल्यानंतर आता या कॅम्पेनची धग दिल्लीपर्यंत पोचली आहे. महिला पत्रकारांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार, ज्येष्ठ संपादक एम. जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले जाऊ शकते. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या अकबर यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या वादावर अकबर यांनाही बाजू मांडण्याची संधी दिली जावी, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि उत्तर प्रदेशातील भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी म्हटले आहे. 

'फोर्स' या नियतकालिकाच्या कार्यकारी संपादिका गझला वहाब यांनीही आज अकबर यांच्यावर शोषणाचा आरोप केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आतापर्यंत सहा महिला पत्रकारांनी अकबर यांच्याविरोधात शोषणाचे आरोप केले आहेत. दुसरीकडे एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लेखक आणि सेलिब्रिटी कन्सल्टंट सुहेल सेठ यांच्यावरही चार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सेठ यांच्याविरोधातही तक्रार दाखल होऊ शकते. एका भारतीय हवाईसुंदरीने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने क्रीडा क्षेत्रालाही हादरा बसला आहे. 

हे आरोपीच्या पिंजऱ्यात 
नाना पाटेकर 
आलोकनाथ 
विकास बहल 
रजत कपूर 
कैलास खेर 
विरामुथू गायक 
एम. मुकेश दाक्षिणात्य अभिनेते 
अभिजित भट्टाचार्य 
वरुण ग्रोव्हर 
रघू दीक्षित 

अत्याचार होताच महिलांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा, जे चुकीचे आहे ते समोर यायलाच हवे 
राधे माँ, स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू 

कोणत्याही महिलेसोबत गैरवर्तणूक केली जात असेल तर माझा त्याला विरोधच आहे. अशा प्रकारची कृत्ये तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून द्यायला हवीत किंवा याविरोधात तक्रार नोंदवून कायद्याचा आधार घेतला जावा. 
अमिताभ बच्चन, अभिनेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akbar will resign from the ministry