Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

Dhirendra Shastri Akhilesh Yadav political war : दोनदा हात जोडून मागितली माफी, तरीही वाद पेटलाच; २०२७ च्या निवडणुकीआधी 'कृष्ण विरुद्ध राम' वादाने उत्तर प्रदेशचे राजकारण तापले!
'Ram vs Krishna' Conflict Before UP Elections

'Ram vs Krishna' Conflict Before UP Elections

Sakal

Updated on: 

'Ram vs Krishna' Conflict Before UP Elections : उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवकाश असतानाच, राज्यात आता थेट 'राम विरुद्ध कृष्ण' असा नवा धार्मिक आणि राजकीय संघर्ष पेटला आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या गुणांची तुलना करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Loading content, please wait...