“अगले जन्म मुझे गैया नहीं चीता कीजो”; मोदींचा फोटो ट्विट करत अखिलेश यादवांचा टोला

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चिते सोडले. त्यावर आता राजकारण सुरू झाले आहे. चित्ते आणण्याची प्रक्रिया काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी लम्पी व्हायरसमुळे त्रासलेल्या गायींची चित्त्यांशी तुलना करून मोदींना टोला लागवला आहे.

Narendra Modi
Cheetah: मोदींनी आणलेल्या चित्त्यांच्या अभयारण्यात चर्चा भीषण कुपोषणाची

अखिलेश यादव यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केले आहे. अखिलेश यादव यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात लिहिले की, पुढच्या जन्मात मला गाय म्हणून जन्म नको, तर हवा चित्ता म्हणून जन्म! या व्यंगचित्राच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी मोदींच्या कुनोमध्ये चित्ते सोडलेल्या कार्यक्रमाची खिल्ली उडवली. तसेच लम्पी व्हायरसमुळे मरणाऱ्या गायीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आकडेवारीनुसार, लम्पी विषाणूमुळे देशभरात सुमारे 58,000 गायींचा मृत्यू झाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये जनावरांना या विषाणूची लागण झाली आहे . पंजाब, गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक गायी बाधित झाल्या आङेत. जनावरांना लम्पी विषाणूची लागण होत असल्याने शेतकर्‍यांचे अधिक नुकसान होत असून ज्या शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह जनावरांवर अवलंबून आहे, त्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, जेव्हा पंतप्रधान मोदींनी नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडले, तेव्हा अखिलेश यादव यांनी लम्पी व्हायरसवरून सरकारची खिल्ली उडवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com