

Akwan Cyclone Live News
esakal
Cyclone Akwan : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ अतितीव्र झाले असून, त्याचा प्रभाव पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या विदर्भातही जाणवण्याची शक्यता आहे. वादळाची दिशा बदलल्याने शुक्रवारी (ता. २०) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशातील नरसापूर ते ओडिशातील पुरीदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.