Delhi Car Blast Case: ‘अल फलाह’चे दहशतवादी कनेक्शन; साखळी बाँबस्फोटांतील आरोपी हा माजी विद्यार्थी
Background of the Al Falah University Terror Link: अल फलाह विद्यापीठाचा दहशतवादी कनेक्शन, दिल्ली कार स्फोट प्रकरण आणि एनआयए तपास यातील नवे धागेदोरे समोर. फरार दहशतवादी, डॉक्टर नेटवर्क आणि साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी संशयितांविषयी महत्त्वपूर्ण तपशील.
फरिदाबाद : राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोटार स्फोटप्रकरणात ‘व्हॉईट-कॉलर टेरर मोड्यूल’ उघडकीस आल्यानंतर अल फलाह विद्यापीठाचे दहशतवादी नेटवर्कशी दीर्घकाळापासून संबंध असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.