काँग्रेसपासून सावध राहा - नरेंद्र मोदी

पीटीआय
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

झारखंडला अनिश्‍चितता आणि अंधकारात ढकलण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा इरादा आहे, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या एका प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

बोकारो (झारखंड) - झारखंडला अनिश्‍चितता आणि अंधकारात ढकलण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा इरादा आहे, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या एका प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘झारखंड हे राज्य १९व्या वर्षांत पदार्पण केलेल्या युवकाप्रमाणे असून, येथील जनता ही या राज्याची पालक आहे. त्यामुळे राज्याच्या भविष्याचा विचार करून त्यांनी विचारपूर्वक मतदान करून पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी. केवळ भाजप पक्षच राज्यात स्थिर सरकार देऊ शकतो. २०१४ पूर्वीच्या भ्रष्ट सरकारची आणि सध्याच्या रघुबर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना करा. पूर्वीच्या सरकारने जोपासलेले भ्रष्टाचाराचे जाळे भाजप सरकारने नष्ट केले,’’ असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alert of congress narendra modi