Aligarh Crime: अलीगढमध्ये पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेला ५० हजारांचा इनामी हिस्ट्रीशीटर शाका अखेर चकमकीत जेरबंद झाला. त्याच्या पायात गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अलीगढमधील टप्पल क्षेत्रातील जलालपूर गावात धाड टाकताना एका शिपायावर गोळी झाडणाऱ्या ५० हजार रुपयांच्या इनामी आणि हिस्ट्रीशीटर असलेल्या ओमप्रकाश उर्फ शाका याला बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी चकमकीत अटक केली.