'हिंदूंची कबर खोदली जाईल...;अलिगड'च्या विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

12 डिसेंबरला व्हिडिओ झाला पोस्ट

नवी दिल्ली : नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाचा विरोध करणाऱ्या अलिगड मुस्लिम विश्वविद्यालय (एएमयू) च्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांनी हिंदूंविरोधात घोषणाबाजी केल्या. विद्यार्थ्यांच्या या घोषणाबाजीला भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष रंजन राय विरोध केला. राय यांनी ट्विट करत सांगितले, की एएमयूच्या छातीवर हिंदूंची कबर खोदली जाईल. हेच आता भारतात ऐकायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्विटरवर अशा स्वरूपाचा व्हिडिओ पाहिला मिळत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदूंविरोधात घोषणाबाजी केली हे दिसत आहे. हे सर्व चुकीचे आहे. विद्यार्थ्यांकडून हिंदुत्त्व, सावरकर, भाजप, ब्राह्मणवाद आणि जातिवादविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. 'हिंदुत्त्वाची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. सावरकरांची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. भाजपची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. ब्राह्मणवादाची कबर खोदली जाईल, एएमयूच्या छातीवर. 

आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

12 डिसेंबरला व्हिडिओ झाला पोस्ट

विद्यार्थ्यांनी केलेल्या या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष रंजन राय यांनी यावर आक्षेप घेत याचा व्हिडिओ व्हायरल केला. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ 12 डिसेंबर, 2019 मध्ये पोस्ट करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aligarh muslim university students gives Proclamation against the India