कर्नाटकातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; बंडखोरांना संधी

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

तेरा आमदारांच्या बंडांनंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी "डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली होती. त्यानंतर आज (सोमवार) माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे सर्व 22 मंत्री राजीनामा देणार असल्याचे सांगितले. कर्नाटकातील सरकार स्थिर असल्याचे काँग्रेस नेते जमीर अहमद यांनी म्हटले आहे.

बंगळूर : कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढल्यानंतर काँग्रेसच्या सर्व 22 मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असून, बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.

तेरा आमदारांच्या बंडांनंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी "डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली होती. त्यानंतर आज (सोमवार) माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे सर्व 22 मंत्री राजीनामा देणार असल्याचे सांगितले. कर्नाटकातील सरकार स्थिर असल्याचे काँग्रेस नेते जमीर अहमद यांनी म्हटले आहे.

या दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू असून, भाजपनेही आधी विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या, मग आम्ही सत्ता स्थापनेचे बघू, असे वक्तव्य केले आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे आज सायंकाळी न्यूयॉर्कमधून थेट बंगळूरमध्ये दाखल होणार आहेत, त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. 

कर्नाटकमधील या राजकीय अस्थैर्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. तर, आज संसदेतही याचे पडसाद पाहायला मिळाले. सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकलेले दहाही आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे समजते. कर्नाटकमधील "ऑपरेशन कमळ'ची सूत्रे सध्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हाती असून, राज्य सरचिटणीस अरविंद लिम्बावली हेदेखील यात सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All 22 Karnataka Congress ministers have resigned says Siddaramaiah