आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य - केंद्र सरकार

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरादारीचा उपाय म्हणून हे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
britain airport
britain airportFile Photo

नवी दिल्ली - देशातील कोरोना (Coroana Cases In India) बाधितांच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travelers ) करणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यानंतर 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन (Home Quarantine) अनिवार्य करण्याचा आदेश दिले आहेत. सात दिवसांनंतर आठव्या दिवशी RTPCR चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, हे आदेश 11 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. (All International Passengers 7 day Mandatory Home Quarantine)

1 डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 11 देशांना जोखीममध्ये समाविष्ट करण्यात आले होते, त्यात यूके, युरोपमधील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश करण्यात आला होता, आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, त्यात आणखी 9 देशांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देशांमध्ये घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

देशात १ लाख १७ हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून तिसरी (Covid Third Wave) लाट आल्याचंही म्हटलं जात आहे. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो ७.७४ टक्के इतका झाला आहे. (India Records 1 Lakh Plus New Corona Cases)

britain airport
TET आणि MHADA परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना कोरोनाची लागण

सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ सक्रीय रुग्ण आहेत. लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत १४९ कोटी ६६ लाख डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमिक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid 19 Active Cases In India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com