
2024 पर्यंत ईशान्येकडील राज्यांचे सर्व प्रश्न सोडवणार; अमित शहा यांची ग्वाही
हैदराबाद : ईशान्येकडील राज्यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली सुरू असून येथील प्रश्न सोडविण्यासाठी भाजपला कायमस्वरुपी तोडगा सापडल्याचे अमित शहा यांनी सांगितलं. हैद्राबाद येथे आयोजित भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत ते बोलत होते. आगामी काळात ईशान्यकडील राज्यांना कोणतीही समस्या राहणार नाही. तसेच 2024 पर्यंत येथील सर्व प्रश्न सुटतील, असेही ते म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय ठरावावर गृहमंत्री शहा यांनी हे वक्तव्य केले.
हेही वाचा: RTIमध्ये खुलासा! ना ताजमहलमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती, ना मंदिरांच्या जागेवर ताजमहल
उल्लेखनीय म्हणजे, मार्च महिन्यात केंद्र सरकारने नागालँडच्या सात जिल्ह्यांतील 15 पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातून, मणिपूरच्या सहा जिल्ह्यांतील 15 पोलिस ठाण्याच्या क्षेत्रांतून आणि 23 जिल्ह्यांमधून संपूर्णपणे आणि आसाममधील एका जिल्ह्यातून अंशत: AFPSA काढून टाकले होते.
आसाम आणि मेघालय सरकारने या वर्षी मार्चमध्ये त्यांच्या 50 वर्षांपासूनच्या सीमावादाचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी 31 जानेवारी रोजी अमित शहा यांच्याकडे एमएचएकडून तपासणी आणि विचारासाठी मसुदा सादर केला. त्यानंतर दोन महिन्यांनी आसाम आणि मेघालय यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
शहा यांच्या भाषणावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा निघाला आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. यावेळी बिस्वा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा अद्याप लागू न करण्याचे कारणं सांगितलं. ते म्हणाले की, मोदी सरकारने आणलेल्या सुधारणांवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कायदा लागू करण्यास विलंब झाला आहे. तथापि, सरकार त्यासाठी वचनबद्ध असून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईलच असंही ते म्हणाले.
Web Title: All Problems Of Northeast Will Be Solved By 2024 Says Amit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..