esakal | दिलासादायक! निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कातील 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

nipah virus found again in Kerala

आरोग्य विभागाने सोमवारी सांगितले होते की, 'निपाहमुळे मृत्यू झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या २५१ लोकांची ओळख पटली आहे. यात १२९ आरोग्य कर्मचारी आहेत.'

निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कातील 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोझिकोड - केरळ कोरोनाच्या विळख्यात सापडले असतानाच निपाह व्हायरसने डोके वर काढले आहे. रविवारी निपाहमुळे राज्यात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

राज्याच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की,"मुलांच्या संपर्कात आलेल्या आठ लोकांची चाचणी करण्यात आली होती. यातील कोणालाही निपाहची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे. मुलाचे आई वडील, आरोग्य कर्मचारी आणि ज्यांच्यात लक्षणे दिसत होती त्यांची टेस्ट घेण्यात आली होती. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं सुटकेचा निश्वास टाकला आहे."

जॉर्ज यांनी सांगितलं की, सध्या हाय रिस्कमध्ये ४८ जण आहेत. या सर्वांना मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत निपाहच्या रिपोर्ट्सची चाणी करण्यात आली. आणखी पाच नमुन्यांची चाचणी केली जात आहे. तसंच मंगळवारी आणखी काही नमुने पाठवण्यात येणार आहे. |

हेही वाचा: फळे धुवून न खाणे धोकादायक; निपाहच्या संसर्गाबाबत एम्सच्या डॉक्टरांचा इशारा

आरोग्य विभागाने सोमवारी सांगितले होते की, 'निपाहमुळे मृत्यू झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या २५१ लोकांची ओळख पटली आहे. यात १२९ आरोग्य कर्मचारी आहेत.' रविवारी कोझिकोडमधील १२ वर्षांच्या मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. त्याच्या घराच्या ३ किलोमीटर परिसराला कन्टेंन्मेंट झोन घोषित करण्यात आलं होतं. निपाह व्हायरसमुळे मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कोझिकोड, कुन्नूर, मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात आरोग्य विभागाने हाय अलर्ट दिला होता.

loading image
go to top