
Allahabad High Court Order: पालकांच्या इच्छेशिवाय लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलीस संरक्षण मागता येणार नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टानं केली आहे. एका जोडप्यानं पोलीस संरक्षणासाठी दाखल केलेल्या एका याचिकेवर निकाल देताना हायकोर्टानं हे भाष्य केलं. यासंदर्भात त्या जोडप्याला समाजिक परिस्थितीला सामोरं जावं लागेल, असा सल्लाही हायकोर्टानं दिला आहे.