

Allahabad High Court, which ruled that wearing a hijab is not an essential part of Islamic faith in the school dress code case.
esakal
प्रयागराज : शाळेच्या गणवेशासोबत हिजाब (हेड स्कार्फ) घालून शाळेत प्रवेश करण्याची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थिनीची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली आहे. हिजाब घालणे हा इस्लामिक श्रद्धेचा असा अनिवार्य भाग नाही की तो न घातल्यास व्यक्ती धर्माबाहेर जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी विविध उच्च न्यायालयांनीही याच स्वरूपाची भूमिका घेतल्याचे खंडपीठाने नमूद केले.