

Allahabad High Court takes strict action against cyber cell and telecom authorities for blocking a woman’s mobile number based on a false complaint.
esakal
पतीच्या खोट्या तक्रारीनंतर पत्नीचा मोबाईल नंबर ब्लॉक करणे पोलिसांच्या सायबर सेलला आणि मोबाईल कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. हायकोर्टाने पोलिसांना आणि मोबाईल कंपनीलाही याबाबत फटकारले आहे. हे प्रकरण उत्तरप्रदेशातील असून अलाहाबाद हायकोर्टाने मोबाईल नंबर चालू करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. हायकोर्टाने स्पष्ट केले की, सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागू नये.