विभक्त राहणाऱ्या पत्नीने आत्महत्या केल्यास पतीचा दोष नाही: HC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

allahabad high court

विभक्त राहणाऱ्या पत्नीने आत्महत्या केल्यास पतीचा दोष नाही: HC

अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) नुकत्याच दिलेल्या एका निकालाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विभक्त झालेल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर कोर्टाने पतील निर्दोष घोषित केले आहे. पतीवर आत्महत्येला प्रोत्याहित केल्याचा गुन्हा दाखल न करता कोर्टाने असे स्पष्ट केले आहे की, जो पर्यंत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे ठोस पुरावे जो पर्यंत आढळत नाही तो पर्यंत कुठलीही कारवाई करु नये अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे.

न्यामुर्ती अजय त्यागी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर जगवीर सिंग नामक याचिकाकर्त्याने पीलभीत अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या एका निकालाला आव्हान दिले आहे. या निकालानुसार जगवीर सिंगला पत्नीच्या आत्महत्येसाठी भा.द.वि. च्या कलम ४९८ अ आणि ३०६ अंतर्गत दोषी ठरवले होते. १४ डिसेंबर २००८ मध्ये झालेल्या या प्रकरणात या व्यक्ती विरोधात त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा: महंत नरेंद्र गिरींची केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरुन हत्या - काँग्रेस

जगवीर सिंग याच्या पत्नीचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. पत्नीला हुंड्यासाठी त्रास दिला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र या प्रकरणात सबळ पुरावे आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आरोपीचा सहभाग यावरुन सदरील व्यक्तीला दोषी ठरवले जाऊ शकते असे न्यायालयाने सांगितले आहे.

Web Title: Allahabad High Court Said Husband Is Not To Blame If Divorced Wife Commits Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Allahabad high court