
‘हिंडेनबर्ग रिसर्च’चे आरोप तथ्यहीन; अदानी
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चने आमच्यावर केलेले हिशेबातील फेरफारीचे वा फसवणुकीचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत. अदानी समुहातील नऊपैकी आठ कंपन्यांचे लेखापरीक्षण सहा मोठ्या लेखापरीक्षण कंपन्यांपैकी एका कंपनीतर्फे करण्यात येत असते, असे स्पष्टीकरण अदानी उद्योगसमूहाच्या वतीने करण्यात आले.
कंपनीने शेअर बाजाराला पाठवलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. ‘‘आम्ही एक इनक्यूबेटर म्हणून काम करतो. च आठ क्षेत्रांमध्ये आमच्या सहाय्यक व सहयोगी कंपन्या कार्यरत आहेत. अदानी एंटरप्रायजेसमधील विविध संस्थांचे लेखापरीक्षण २७ हून अधिक वैधानिक लेखापरीक्षण कंपन्या करीत असतात.
यातील चार लेखापरीक्षण कंपन्या अत्यंत प्रतिष्ठित आहेत,’’ असे निवेदनात म्हटले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एमआयएएल) या अदानी एअरपोर्टच्या उपकंपनीचे लेखापरीक्षण ग्रँट थॉर्नटन या संस्थेद्वारे केले जाते, तर इतर सहा विमानतळांचे लेखापरीक्षण हे गायेंद्र अँड कंपनी या कंपनीद्वारे एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया पॅनेलच्या तरतुदींनुसार केले जाते.”
असेही म्हटले आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या म्हणण्यानुसार, ‘‘हिंडेनबर्गने उपस्थित केलेले २१ प्रश्न आणि न्यायालयीन प्रकरणांचे संदर्भ हे मुळात समुहातील कंपन्यांनी स्वतःच केलेले सार्वजनिक खुलासे आहेत.