"ममता बॅनर्जींना 'मुमताज खान' नाव दिलं होतं"; पश्चिम बंगालमध्ये साधूंवरील हल्ल्यामुळं अयोध्येतील मुख्य पुजारी संतापले

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली. याववर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी संताप व्यक्त केला.
Acharya Satyendra Das
Acharya Satyendra Das
Updated on

Acharya Satyendra Das

पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक लोकांनी त्यांना अपहरणकर्ते समजले, त्यानंतर जमावाने साधूंवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साधूंना गर्दीतून वाचवले आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली जेव्हा उत्तर प्रदेशातील तीन साधू, एक व्यक्ती आणि त्याची दोन मुले मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्यासाठी गंगासागर येथे जात होते. यावेळी तो रस्ता चुकला, त्यावर त्यांनी तीन मुलींना वाटेबाबत विचारले. साधूंना पाहताच मुली ओरडत पळत सुटल्या. यानंतर स्थानिक लोकांनी साधूला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान या प्रकरणावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी संताप व्यक्त केला. आचार्य सत्येंद्र दास म्हणतात, "ममता बॅनर्जी यांना मुमताज खान हे नाव कोणीतरी दिले होते. रामनवमी आणि इतर धार्मिक मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. भगवा रंग पाहिल्यावर ममता बॅनर्जी यांना राग येतो आणि त्यामुळेच त्या हे हल्ले घडवतात. हल्ल्याच्या या घटना अत्यंत निषेधार्ह आहेत.

Acharya Satyendra Das
देर आये दुरुस्त आये...कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे येण्याआधीच शिंदे यांची टोलेबाजी

प्रभू रामाच्या राजकीय वापरावर देखील आचार्य सत्येंद्र दास यांनी भाष्य केले आहे. "राजनीती आणि धर्मनीती वेगळी आहे. भाजपने प्रभू रामांना स्वतःचे बनवले आणि आज त्यांचा आशीर्वाद आहे. ही 'राजनीती' नसून 'धर्मनीती' आहे." (Latest Marathi News)

इतर कोणत्याही राजकीय पक्षाने प्रभू राम लल्लाला कायमस्वरूपी मंदिरात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता का, असे विचारले असता. यावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "नाही, असा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. आता राम राज्य येत आहे."

Acharya Satyendra Das
Uddhav thackeray: अटल सेतूचं उद्घाटन पण अटलजींचा फोटो नव्हता आता राम मंदिरावेळी... ठाकरेंचा भाजपवर घणाघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com