Uddhav thackeray: अटल सेतूचं उद्घाटन पण अटलजींचा फोटो नव्हता आता राम मंदिरावेळी... ठाकरेंचा भाजपवर घणाघात

आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली. घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला.
Uddhav thackeray
Uddhav thackeray
Updated on

Uddhav thackeray:  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शन घेणार तसेच गोदातीरी आरती करणार असल्याचे सांगितले. आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली. घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला. 

२३ जानेवारीला शिवसेनेते शिबिर आणि संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. आम्हाला असं वाटतं २२ तारखेला अयोध्येत प्रभूराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामचंद्र एकटे नसतात. त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि सिता, हनुमान असतात. ही प्राणप्रतिष्टा फक्त रामाची नाही तर राष्ट्राची आहे. ज्याप्रमाणे बाबरी बांधली तसेच सोमनाथ मंदिराचा देखील विधंस्व झाला होता. सरदार वल्लभ भाई पटेल यांनी पुढाकार घेतला आणि मंदिर पुन्हा बांधल. मात्र लोकार्पण झाल तेव्हा सरदार वल्लभ भाई पटेल नव्हते. त्यांचे निधन झाले होते. सोमनाथ मंदिर आणि लोकार्पणला तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्याहस्ते प्राणप्रिष्ठा झाली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काळाराम मंदिरात दर्शन सोहळ्याचे निमंत्रण आम्ही राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांना निमंत्रण देणार आहतो.

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली. ते म्हणाले, "मी देशभक्त आहे अंधभक्त नाही. मी कडवट हिंदुत्ववादी आहे, राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहिती आहे. २२ जानेवारीला दिवाळी नक्की साजरी करा पण केंद्र सरकारने देशाचं दिवाळं काढलं त्याची देखील चर्चा व्हायला हवी."

मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर १ वर्षाच्या आत कोर्टाचा निकाल आला. कारसेवक नसते तर मंदिर झालं नसतं. कारसेवकांचा हा गौरव आहे. झेंडे लावयला अनेक येतात पण लढण्याची वेळ आली तेव्हा कोणीही नव्हत. राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येत जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav thackeray
PM Modi Nashik Visit : भगवान आपली वाट बघताहेत; महंत शंकरानंद सरस्वतीचे पंतप्रधान मोदींना त्र्यंबकेश्वरचे निमंत्रण

काल अटल सेतूचं उद्घाटन झालं पण उटलजींचा फोटो कुठं होता?. राम मंदिर बांधल पण त्यात कृपया स्वत:ची नाही तर रामाची मूर्ती लावावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

घराणेशाही मोडून काढा असे नाशिकमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते, यावर ठाकरे म्हणाले, "चांगली गोष्ट आहे. प्रभूरामचंद्र हे दशरथराज्याचे पुत्र होते. त्यावेळी त्यांना वनवासात जावं लागलं. वनवासात जाताना ते सहकुटुंब गेले होते आणि सिताहरण झाल्यानंतर रामायण घडलं. मी आज कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार आहे. त्यामध्ये गद्दारांची घराणेशाही आहे. त्यावर नरेंद्र बोलले नाहीत. ही घराणेशाही त्यांना चालते का? गद्दारांची घराणेशाही त्यांना प्राणप्रीय आहे. हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं."

नरेंद्र मोदी म्हणाले तिजोऱ्या भरल्या मात्र आजुबाजूला ७० हजार कोटींचे घोटाळे झाले. त्याच्या चाव्या मोदींकडे आहेत वाटतं. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार कोटींची घट झाली हे पैसे कोणी काढले?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.  (Latest Marathi News)

Uddhav thackeray
Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com