
हैदराबाद : सिनेमागृहातील चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला तेलंगण उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर देखील त्याला शुक्रवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. त्याची शनिवारी सकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत तुरुंग प्रशासनाला वेळेत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला कोठडीतच राहावे लागले.