corona vaccin
corona vaccin

कोरोना व्हॅक्सिनचं उत्पादन सुरू; सीरमच्या CEOनी दिली माहिती

Published on

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून व्हॅक्सिन कधी येणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. जगभरात अनेक देशांमधील कोरोना व्हॅक्सिनच्या ट्रायल सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड लस आघाडीवर आहे. कोविशिल्डची निर्मिती भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार असून व्हॅक्सिनबाबत सीईओ आदर पूनावाला यांनी माहिती दिली आहे. एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, ऑक्सफर्डच्या कोरोना व्हायरस व्हॅक्सिनचे 100 मिलियन डोस तयार करण्याचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य 2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीमध्ये गाठता येईल असंही पूनावाला यांनी सांगितलं. 

आदर पूनावाला यांनी म्हटलं की, सध्याची व्हॅक्सिन निर्मिती प्रक्रिया पाहता जवळपास डिसेंबरच्या शेवटी चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईल. जर सर्व काही सुरळीत पार पडलं तर जानेवारीमध्ये डोस देणं शक्य होईल. ट्रायलमध्ये मिळालेल्या यशामुळे व्हॅक्सिनचं उत्पादन सुरू केलं आहे. 

ब्रिटनमध्ये सध्या अॅडव्हान्स ट्रायल घेतली जात आहे. त्यांच्याकडून डेटा मिळाला तर आपत्कालीन ट्रायलसाठी आरोग्यमंत्रालयाकडे अर्ज देण्यात येईल. जर त्याला मंजुरी मिळाली तर आम्हालाही भारतात अॅडव्हान्स टेस्ट करता येतील असं आदर पूनावा यांनी सांगितलं.

सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी व्हॅक्सिन उत्पादक कंपनी आहे. सध्या एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्यासोबत मिळून कोरोना व्हॅक्सिनवर सीरम काम करत आहे. जगात 150 हून अधिक लशींची चाचणी घेतली जात असून त्यापैकी 38 लशींची ह्यूमन ट्रायल सुरू आहे. यामध्ये मॉडर्ना, फाइजर इंक, एस्ट्राजेनेका, पीएलसी यांसारख्या कंपन्यांच्या व्हॅक्सिनची ट्रायल अंतिम टप्प्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com