esakal | मुख्यमंत्र्याचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेस खासदाराची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh Lost Mental Balance, Says Congress MP In Punjab Feud

काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत वाद काही केल्या शांत होताना दिसत नाहीयेत. राजस्थानमधील (Rajshtan)मधील राजकीय संघर्ष शांत होण्याच्या मार्गावर असतानाच पंजबामध्ये नव्या काँग्रेसमधील नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

मुख्यमंत्र्याचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेस खासदाराची टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंदीगड : काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत वाद काही केल्या शांत होताना दिसत नाहीयेत. राजस्थानमधील (Rajshtan)मधील राजकीय संघर्ष शांत होण्याच्या मार्गावर असतानाच पंजबामध्ये नव्या काँग्रेसमधील नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस खासदार प्रताप सिंह बाजवा (Pratap Singh Bajwa) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्यावर टीका केली असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एएनआयशी बोलताना प्रताप सिंह बाजवा म्हणाले की, 'खासदार शमशेर सिंह दुल्लो आणि मी १२१ लोकांच्या हत्यांवरून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून स्वतःच्याच पक्षातील खासदारांनी प्रश्न उपस्थित केल्याने त्यांची गडबड झाली आहे. दोन वर्षापूर्वी अमृतसरमध्ये एक रेल्वे दुर्घटना झाली होती. ज्यामध्ये एकूण ६० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यानी हा तपास एसआयटीकडे दिला होता. परंतु याचे पुढे काहीच नाही झाले. त्यानंतर बटाला फॅक्ट्रीमध्ये एक ब्लास्ट झाला होता, त्याचाही तपास एसआयटीकडे देण्यात आला होता परंतु या तपासातूनही काही निष्पण्ण झाले आहे. आम्ही एसआयटीबद्दल विचारणा करत आहोत. जो तपास आपण एसआटीकडे देता त्याचे पुढे काय होते? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, असे खासदार प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्रीही ते असल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाची उत्तरे देणे अपेक्षित आहे.

प्रताप सिंह बाजवा पुढे म्हणाले की, 'मी राज्यपाल महोदयांसमोर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासोबतच या सर्व गोष्टींच्या चौकशीची मागणी ईडी आणि सीबीआयकडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली सुरक्षा यंत्रणाही काढून घेतली असल्याचा आरोप बाजवा यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.